Sunday, January 9, 2022

 *अमृतबोल :: भाग - १०*

*गुरु हा संतकुळीचा राजा*

 

      *जीवन सुखाने जगायचं असेल तर त्यासाठी आपली lifestyle  बदलली पाहिजे.* *हल्ली आपली lifestyle  आपण दुसऱ्यांना दुःख देतो' त्रास देतो' यातून कुणीच सुखी होऊ शकत नाही.पण तुम्ही एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा सर्व सुखी होतील.इथं येऊन तुम्हाला मी सुखी करण्याचा प्रयत्न* *करतो.संप्रदाय वाढविण्यासाठी इथं मी आलेलो नाही.कुठल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी नाही' तुम्ही सर्व सुखी व्हावेत कारण तुम्ही सुखी झालात तरच आम्ही सुखी होणार हे मला माहित आहे.म्हणून "सुख द्या सुख द्या निसर्गाचा नियम हा"* 

  आम्हाला जग सुखी करायचंय लोकांना सुखी करायचंय ! लोकांना सुखी करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम करतो.त्यापैकी अत्यंत महत्वाचा उपक्रम  म्हणजे कोर्सेस ! आम्ही जे कोर्सेस सुरु केले त्याने अनेक लोकांचं कल्याण झालं.अगदी आत्महत्या करायला निघालेले लोक आज सुखाने जीवन जगताहेत.मुद्दा हा की या कोर्सेस मुळे जीवनविद्येच्या ज्ञानामुळे अनेकांचे संसार सुखाचे झाले.अनेकांची प्रगती झाली' उत्कर्ष झाला. उन्नती झाली.कोर्सेस आणि आम्ही जी प्रवचन करतो त्यात फरक काय आहे ? कोर्सेसमध्ये आम्ही जे सात विषय मांडलेत ते अत्यंत प्रभावीपणे दोन दिवसांमध्ये तुम्हाला शिकवलं जात.सुख म्हणजे काय ? मन म्हणजे काय ? विचारांचं सामर्थ्य' Divine  bank  म्हणजे काय ? हा शब्द कित्येकांना माहित नसेल ! साधी बँक माहित असेल' पण डीव्हीने बँक सुदर्शन चक्र' वगैरे जे सात विषय त्यात आहेत ते कोर्सेसमध्ये प्रभावीपणे मांडले जातात की आम्हाला त्यातून ज्या reaction  मिळालेल्या आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल ! म्हणून कोर्सेस तुम्ही attend  करा' हे मी मार्केटिंग करत नाही.तुमच्याकडून मला काही मिळवायचं नाही.मी सुरुवातीलाच सांगितलं की *या पैना तुमच्याकडून पैची पण अपेक्षा नाही.* म्हणून कोर्सेस करायचे की न करायचे हे तू ठरव कारण *"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"* इथं जीवनविद्येत *हा सूर्य आणि हा जयद्रथ* ! अनुभव घेऊन बघा ! जीवनविद्येचे ग्रंथ वाचा ! *वाचाल तर वाचाल.* 

  एक कार्लाइल नावाचा लेखक सांगतो की *tell  me what  you like ' & I will tell you what you are" तस मी सांगतो की Tell  me  what  you speake & I will Tell what  you are"* सर्वांच्याच बाबतीत मी हे सांगतोय.विद्यार्थ्यांच्या तोंडात काय आहे' शिव्या आहेत तर मुळे बिघडली ! आणि प्रार्थना म्हणताहेत तर सुधारली ! विश्वप्रार्थना कानात पडली तर हळूहळू मुखात येऊ लागेल' तोंडातून बाहेर पडेलच पण हळूहळू मनात जाईल आणि तुमच्या जीवनाचं सोन करील.म्हणून हे प्रार्थनेचा मशीन घ्यायचं की न घ्यायचं हे तू ठरव कारण *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* 

मुद्दा हा की ही आपली जीवनाची बैठक बदलायची त्यासाठी काय करायचं ? सर्वांनी सुखी कस व्हायचं ? हे आपण उद्या पाहू ! 


 

☘☘️🌺🌹🙏🙏🌹🌺☘☘️