▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖
❱❱❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा* 〇
*🔘माझे शैक्षणिक उपक्रम🔘*
════════════════
*चला अक्षरातून......*
*शब्दांची बाग तयार करु या....*
━━━━━━━━━━━━━━━━
*चला अक्षरातून....*
*शब्दांची बाग तयार करु या...हा उपक्रम पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गासाठी घेता येतो.*
*🔹उपक्रमांसाठी लागणारे साहित्य🔹*
*====================*
*विविध रंगांचे खडू,फळा,वही,पेन*
*🔹शाब्दिक खेळाची कॄत्ती🔹*
*====================*
*🔸शिक्षकांनी व गटप्रमुखाने फळ्यावर एक अक्षर लिहुन द्यावे.*
*🔹प्रत्येक विद्यार्थ्याने त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहावं.*
*उदाहरणार्थ- "म" अक्षर असेल तर मुले मन,मगर,मदरसा, मनोरंजन असे अनेक शब्द तयार करतील.*
*🔸तयार झालेल्या शब्दापासून खालील उपक्रम किंवा कॄती घेता येईल.🔸*
*=====================*
*🔸शब्दांचे व्यक्तिक व सामुहिक शब्दांचे वाचन व लेखन व अनुलेखन घेणे.*
*🔹तयार झालेल्या शब्दांतून दोन,तीन,चार वर्गाच्या स्तरानूसार शब्दांचे वगीॅकरण करणे.जसे दोन अक्षरी मन,तीन अक्षरी मगर असे तयार करावयास सांगणे.*
*🔸शब्दाच्या साह्याने वाक्य बनविणे,तीन शब्द घेवून गोष्ट बनविणे.*
*🔹या शब्दाच्या खेळातून व्याकरणाचा देखील अभ्यास घेता येतो जसे तयार झालेल्या शब्दांतून नाम,सर्वनाम, विशेषण, प्राण्यांची,पक्ष्यांची,गावाची,फळांची, फुलांच्या नावाची यादी करणे.*
*🔸जो जास्तीत जास्त शब्द तयार करेल त्यास बक्षिस देवून सन्मानित करावे.*
*🔸शब्दिक खेळाचा उपयोग🔸*
*=====================*
*🔹 विद्यार्थ्यांच्या शब्द संपत्तीत वाढ होणे.*
*🔹विद्यार्थ्यांच्या वाचन विकास,निरीक्षण व आकलन क्षमतेत वाढ होते.*
*🔹मुले तयार झालेल्या शब्दांचे वर्गीकरण करणे.*
*🔸श्रुत लेखन व अनुलेखन करणे.*
📚━━━━━━━━📚
📞 ** 📞
═══════════════
अभ्यास कसा करावा ?
🍁🍁🍁🍁
प्रस्तुत लेख "विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य" या रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.
🍁🍁🍁🍁
कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.
🍁🍁🍁🍁
स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.
योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.
🍁🍁🍁🍁
१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.
🍁🍁🍁🍁
२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.
🍁🍁🍁🍁
३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.
🍁🍁🍁🍁
४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.
💠💠💠💠💠आमची शाळा आमचा उपक्रम 💠💠💠💠💠उपक्रम छोटा पण फायदा मोठा💠💠💠💠💠
उपक्रमाचे नाव ...चुकीचे शब्द बरोबर करुन पुन्हा लिहा
प्रथम फळ्यावर चुकीचे शब्द लिहीणे उदाहरणार्थ
महाराषटर ,नमसकार,स्वछता ,दरशन ,गठा ,परवास ,अशाप्रकारे धड्यातील जोडाक्षरे लिहीली तरी चालतील
फायदे
1) मुलांची वाचन क्षमता वाढते.
2) जोडाक्षरांतील चुका शोधने
यामुळे जोडाक्षरे पक्की होतात.
3) सरावाने मुले जोडाक्षरे चांगली वाचतात🙏🏻🙏🏻